Pune City News
राष्ट्रीय

नरेंद्र मोदी हे ‘सरेंडर’ मोदी; राहुल गांधी

चीनबरोबर वाढत्या तणावाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला.

मोदींनी बीजिंगला ‘शरण’ गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी हे ‘सरेंडर’ मोदी आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली.

‘जपान टाईम्स’मधील एका लेखाची लिंक शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

चीनने भारताच्या जमिनीवर घुसखोरी केली नसल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत केला होता.

जर चीनची ती भूमी असेल, तर आपले जवान शहीद कसे झाले? आणि कुठे शहीद झाले? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.

त्यावर पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास करुन, त्यांची विधाने मोडतोड करुन आरोप केले जात आहेत, असं पीएमओने त्यानंतर स्पष्ट केलं.

LAC वर भारतीय सैन्याच्या 16 बिहार रेजिमेंटच्या जवानांनी चीनचा डाव उधळून लावला. त्यामुळेच चीनला आपल्या सीमेत घुसता आलं नाही, असंही पीएमओने स्पष्ट केलं.

Related posts

पाकव्याप्त काश्मीरबाबत संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान !

Vishal Khandagale

सहा दिवसांत पेट्रोल ‘एवढे’ महागले !

Vishal Khandagale

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; ‘या’ शास्त्रज्ञांचा होणार गौरव

Vishal Khandagale

Leave a Comment