PUNE CITY NEWS :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आदेशच विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसकर यांनी दिले आहेत.
त्यामुळे पुण्यात मास्क वापरणे आता बंधनकारक करण्यात आले असून मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी विना मास्क आल्यास आता नागरिकांकडून ५०० ते १००० रूपयांचा दंड आकारला जाणार असून या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई देखील केली जाणार आहे.
प्रशासनाने वारंवार सांगूनही नागरिक बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आरोग्य विभागाकडू सांगण्यात आलेले नियमही नागरिक पाळत नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. या संकटाला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाला आता कठोर पाउलं उचलणं गरजेचं बनलं आहे.
त्यामुळे नागरिकांनी आता मास्क वापरने बंधनकारक असणार असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

