Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

३ सप्टेंबरपासून ‘पीएमपील ‘ची बस वाहतूक सुरु करण्याचा निर्णय !

PUNE CITY NEWS :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या चार-पाच महिन्यापासून बंद असलेली ‘पीएमपी’ च्या बस गणेशोत्सव संपल्यावर सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या ऑनलाईन बैठकीत झाला आहे.

दोन्ही महापालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, तसेच गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावर गर्दी करू नये असे आवाहन आपल्या महापालिकेकडून करण्यात आले आहे, याच पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलची बससेवा गणेशोत्सव संपल्यानंतर म्हणजेच ३ सप्टेंबरपासून सुरू करण्याचे ठरले आहे. सध्या अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीची वाहतूक व्यवस्था सुरू आहे. त्यात सध्या २५० बस दररोज दोन्ही शहरांत धावत आहेत.

बैठकीस पिंपरी-चिंचवड महापौर सौ. उषा माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. हेमंत रासने, पुणे महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्री. श्रावण हर्डिकर, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेंद्र जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुण्यातील पीएमपीएमएलची बससेवा ३ सप्टेंबरपासून होणार सुरू

गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएलची बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या ३ सप्टेंबरपासून पुणे शहरातील पीएमटी बससेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती.

याबाबत मोहोळ यांनी सांगितले की, ‘पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सुरु करा, अशी मागणी नागरिक करत होते. त्या अनुषंगाने गुरुवारी( दि.२०) रोजी संचालक मंडळाच्या सदस्यांची बैठक पार पडली. यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर, दोन्ही नगरपालिकांचे आयुक्त असे लोक सहभागी झाले होते. यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की, दोन्ही शहरामधील कोरोनाचा संसर्ग पाहता, सध्या तरी गणेशोत्सवापर्यंत ही सेवा सुरु करू नये, मात्र येत्या 3 सप्टेंबरपासून पुण्यातील शहरी बस सेवा सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

ही बस सेवा टप्प्या टप्प्याने सुरु होणार आहे. सुरुवातीला २५ टक्के म्हणजेच ४२१ बसेस सुरु करण्यात येणार आहेत. शहरामधील १३ डेपोंच्या १९० मार्गांवर ही बस सेवा सुरु होणार आहे. यामध्ये गर्दीची ठिकाणे किंवा जिथे बस सेवा सुरु करणे गरजेचे आहे अशा १९० मार्गांची निवड केली जाणार आहे.

ही बस सेवा सुरु करताना, सामाजिक अंतराचे पूर्णतः पालन केले जाणार आहे. प्रत्येक बस मध्ये फक्त ५० टक्केच प्रवासी असणार आहेत. बस थांब्यावर लोकांना उभे राहण्यासाठी स्वतंत्र मार्किंग केले जाणार आहे. अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

Related posts

मास्क वापरण्याबाबत जनजागृती करावी : प्रकाश जावडेकर

Vishal Khandagale

“जनता कर्फ्यु” मधे वाढ : जमाव बंदी कडक !

Vishal Khandagale

बावधनजवळ खाजगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात: तीन जणांचा मृत्यू

Vishal Khandagale

Leave a Comment