Pune City News
राष्ट्रीय

देशात आणखी चार सरकारी बँकांचे होणार खासगीकरण

PUNE CITY NEWS :- देशात आणखी चार बँकांना खासगी हातात सोपवण्याची वेगवान प्रक्रिया केंद्र सरकारने सुरु केली असून यासंदर्भातील निर्देश पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

भरपाई : सरकार पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि आयडीबीआय बँकेत आपली हिस्सेदारी विकू इच्छित आहे.

या बँकांची हिस्सेदारी विकून सरकार कोरोना विषाणूमुळे कर संकलनातील तोट्याची भरपाई करू इच्छिते.

प्रक्रिया : काही अन्य बँकांमध्येही यासाठी सरकारी हिस्सेदारी विकली जाऊ शकते. वित्त मंत्रालयाला पीएमओने पाठवलेल्या पत्रात या वित्त वर्षात चारही बँकांची खासगीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही.

Related posts

एअर इंडियाच्या वैमानिकास कोरोना !

Vishal Khandagale

कोरोना : जागतिक बँकेकडून “भारताला” निधी मंजूर!

Vishal Khandagale

कोरोना; आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद

Vishal Khandagale

Leave a Comment