Pune City News
राष्ट्रीय

सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार !

काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार असल्याचं निश्चित झालं.

त्याचबरोबर पुढच्या सहा महिन्यात पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. ही बैठक सकाळी 11 वाजता सुरु झाली होती.

या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, नारायण स्वामी, भुपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. तर काहींनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष पद सोपवण्यात यावं अशी मागणी केली.

Related posts

50 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश

Vishal Khandagale

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 17 वर

Vishal Khandagale

DRDO कडून ‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी

Vishal Khandagale

Leave a Comment