भारत सरकारने बुधवारी चीनला पुन्हा एकदा दणका देताना पबजीसह 118 चिनी अॅप्सवर बंदी घातली. त्यावर आता चीनकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
प्रतिक्रिया : चीनने भारताच्या कारवाईचा विरोध केला असून “मोबाइल अॅप्सवर भारताने घातलेली बंदी चिनी गुंतवणूकदार व सेवा पुरवठादारांच्या कायदेशीर हितांचं उल्लंघन आहे”, असं चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
“चीन या मुद्द्यावर गंभीर असून भारताने आपली चूक सुधारावी”, असंही वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते जी. फेंग म्हणाले.
बंदी : बुधवारी माहिती तंत्रज्ञान कायदा 69 A नुसार भारताच्या सुरक्षा व सार्वभौमतेला धोका असल्याचं सांगत केंद्र सरकारने पबजी, वी चॅट, लुडो, वॉल्ट यांच्यासह तब्बल 118 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली.
आतापर्यंत एकूण 224 चिनी अॅप्स भारतात बॅन केले आहेत.

