Pune City News
पुणे

सूर्यदत्ता’ देणार १०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

‘”सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षणासाठी (पदव्युत्तर अभ्यासक्रम) १०० विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित एमएस्सी (संगणकशास्त्र), एमकॉम, एमबीए, अखिल तंत्रशिक्षण महामंडळ संलग्नित पीजीडीएम आणि मास्टर इन फाईन आर्टस् व पदव्युत्तर डिप्लोमा (अर्धवेळ) या पाच अभ्यासक्रमांना प्रत्येकी २० याप्रमाणे १०० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. कोरोना संसर्गामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एज्यु-सोशियो कनेक्ट & सीएसआर इनिशिएटिव्ह’ अंतर्गत ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे,” अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रसंगी ‘सूर्यदत्ता’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. शैलेश कासांडे, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्राचार्य अजित शिंदे, विभागप्रमुख मंदार दिवाने आदी उपस्थित होते.

  • तसेच पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे नुकतेच दुर्दैवी निधन झाले. त्यांना चार वर्षाचा मुलगा व अडीच वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या मुलाचा दहावीपर्यंच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने केला जाणार आहे. तो मुलगा जिथे शिकेल, ज्या शाळेत शिकेल तिथला संपूर्ण खर्च सूर्यदत्ता करणार असल्याचे डॉ. संजय चोरडिया म्हणाले.

Related posts

गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना पुणेकर कधीही माफ करणार नाही: महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

जम्बो कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव

Vishal Khandagale

पालखी मार्गांची कामे ३१ मार्च अखेर पूर्ण करा-उप-मुख्यमंत्री पवार

Vishal Khandagale

Leave a Comment