Pune City News
Uncategorized

शिक्रापूर येथे ४१लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील चाकण रोड परिसरातील मांढरे वस्तीलगत शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत अवैधरित्या साठविलेला तब्बल ४१ लाख रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त केला आहे.

अन्न व औषध विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिक्रापूरच्या मांढरे वस्ती परिसरात एका इमारतीमध्ये अवैध्यरित्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली,

पोलीस पथकाने त्या ठिकाणी जात छापा टाकला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी गुटख्याचा साठा जप्त करून पंचनामा केला.

यात वेगवेळ्या प्रकारचा विक्रीस बंदी असलेला पानमसाला, सुगंधित सुपारी, विमल पान मसाला असा तब्बल ४१ लाख ७२ हजार ६२८ रुपये किमतीचा गुटखा मिळून आला आहे,

तर यावेळी शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संदीप गुप्ता याचेकडे चौकशी केली असता सदर गुटखा त्याच्या मालकीचा असून त्याने भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये त्याने गुटखा साठा केल्याचे कबुल केले आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड १९ वॉर रुम’ चे विभागीय आयुक्तानी केले कौतुक

Vishal Khandagale

बारामतीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

Vishal Khandagale

ग्रामीण भागातील कोरोना उपाययोजनाबाबत- उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment