Pune City News
राष्ट्रीय

फिल्मसिटी काढायला निघालेल्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत; डॉ. नीलम गोऱ्हे

उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी काढायला निघालेले आहे त्या राज्यात जिथे महिला सुरक्षित नाही. अशा ठिकाणी साक्षीदार संरक्षण कायदा आणी संबंधित मुलींना संरक्षण देणे अशा आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होणे अतिशय गरजेचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडे उत्तर प्रदेश सरकारने बेजबाबदारपणा आणि अतिशय अयोग्य वर्तन केलेले आहे. या विषयाकडे लक्ष वेधणारे निवेदनाचे पत्र दिलेले आहे. त्यासोबत गुन्हेगारांना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हाथरसच्या घटनेमधून परत महिलेल्या सुरक्षासंदर्भात उतर प्रदेशात भीषण अवस्था समोर आलेली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये जे लोक जबाबदार आहेत, त्या सगळ्यांची चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याच्या भावना गोऱ्हे यांनी व्यक्त केली

Related posts

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा, कंगना ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Vishal Khandagale

घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च काँग्रेस उचलणार !

राष्ट्रीय क्रमवारीत डी. वाय.पाटील दंत महाविद्यालयाला तिसरे स्थान…

Vishal Khandagale

Leave a Comment