प्रतिनिधी :- पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.
- हा तुटवडा लवकरात लवकर दूर करावा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
- पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी( दि.२) रोजी कोरोना संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी ही मागणी केली.
- यावेळी महापौरांनी संगीतले की, खाजगी रुग्णालयातून या इंजक्शनची चढ्या भावाने विक्री केली जात आहे.
- या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. याला आळा बसावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मोहोळ यांनी बैठकीत सांगितले.
- तसेच सरकारी पातळीवर होणाऱ्या RT-PCR टेस्टची क्षमता वाढवण्यासंदर्भातचा देखील चर्चा करण्यात आली.
- या संदर्भात आपण सातत्याने पाठपुरावा करत असून अपेक्षा करूयात की यावर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल.असेही मोहोळ यांनी सांगितले.

