शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज असल्याचं हवाई दल प्रमुख आर. के. एस भदौरिया यांनी स्पष्ट केलं.
- पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य समोरासमोर आल्यापासून दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण शिगेला पोचले आहे.
- या तणावाचा फायदा पाकिस्तान घेत असून भारताच्या सीमेवर त्यांच्याही कुरापती वाढल्या आहेत.
- दोन्ही देशांसोबत सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान भारतीय सैन्य प्रत्येक शत्रूचा सामना करण्यास तयार आहे.
- राफेल हवाई दलात आल्यानंतर भारतीय सैन्याची ताकद वाढली आहे. राफेलच्या आगमनानंतर शत्रूलाही भीती आहे.
दरम्यान, राफेल आणि आपेचे हेलिकॉप्टर्स सैन्य दलाची शक्ती वाढवत असून आम्ही सर्व पातळीवर युद्धासाठी सज्ज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

