कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योगधंदे, व्यावसाय बंद पडले. याचा फटका कलाक्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात पहायला मिळाला. त्यामुळे चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्म वापरायला सुरुवात केली. यात या ओटीटी प्लॅटफॉर्म आता नाटकही पदार्पण करत आहे.
“जस्ट गम्मत” हे विनोदी मराठी नाटक OTT प्लॅटफॉर्म वर महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे. येत्या १२ ऑक्टोबरला झूम अप्लिकेशन लाईव्ह परफॉर्म होणार आहे.
कोरोनाच्या काळात नाट्यगृहे बंद आहेत. गेली ७ महिने नाटक हे बंद आहे. यावर निर्भर असलेले कलाकार हे खऱ्या अर्थाने अडचणीत आलेले असून मनोरंजन क्षेत्र ठप्प झाले आहे.
याचाच एक भाग म्हणून पुण्यातील कलावंतानी कोरोनाच्या काळामध्ये एका विनोदी व्यावसायिक नाटकाची जुळवाजुळव करून नाट्यगृहाची सुरू होण्याची वाट न पाहता OTT प्लॅटफॉर्म वर ऑनलाईन पद्धतीने नाटक प्रेक्षकांसमोर सादर करायचे हे ठरवले.
पहिल्याकाळी प्रेक्षक नाट्यगृहापर्यंत येत असे आणि आता “कलाकार,. प्रेक्षकाकडे” जात आहे ही नवीन संकल्पना घेऊन एक निखळ मनोरंजन म्हणून “जस्ट गम्मत”ह्या व्यावसायिक नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे.
या नाटकाचे निर्माते दत्ता दळवी, लेखक व दिग्दर्शक प्रताप मालेगावकर असून यातील कलाकार गणेश रणदिवे,योगेश शिरोळे,सायली चव्हाण,तेजस्विनी साळुंके,जगदीश चव्हाण,सागर ससाणे,स्वप्निल मद्वेल,समर कांबळे, नेहा दोरके, अविनाश कीर्ती,आणि प्रशांत बोगम हे कलाकार आहेत.

