Pune City News
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींसह तिघांना न्यायालयाचे समन्स

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तीनही आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर राहावं लागणार आहे.

तिघांनाही ७ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी समन्स बजावले.

२०१८ मध्ये अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळच्या कावीर येथील आपल्या घरी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटवरून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

रायगड पोलिसांनी २ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांना अटक करण्यात आली होती.

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामी यांची जामिनावर सुटका केली.

मात्र, या गुन्ह्यात रायगड पोलिसांनी अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरुद्ध अलिबाग न्यायालयात पानी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. त्यावर बुधवारी सुनावणी झाली.

Related posts

कोरोना: ‘एमपीएससीची पूर्वपरीक्षा वेळापत्रकानुसारच’

Vishal Khandagale

मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत : मंत्री जितेंद्र आव्हाड

Vishal Khandagale

अंतिमसत्राच्या परीक्षा रद्द करण्याविषयी युजीसीसोबत पत्रव्यवहार सुरू – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Vishal Khandagale

Leave a Comment