पंजाबमध्ये गहू आणि तांदळाचे जास्त उत्पादन होते. त्यामुळे गहू आणि तांदळाच्या दर, विक्री व विपणन व्यवस्थेबाबत तेथील प्रश्न मोठे आहे. सध्याचे दिल्लीचे शेतकरी आंदोलन देखील या प्रश्नांमुळे सुरू आहे.
शेतकऱ्यांना बाजाराचा अभ्यास असणे आवश्यक आहे. मी कृषिमंत्री असताना पंजाबच्या शेतकऱ्यांना गहू आणि तांदळाचे क्षेत्र कमी करू त्याठिकाणी डाळी व फळबागा लागवडी वाढवण्यासाठी आवाहन केले होते. मात्र त्याबाबत फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सोमवार (दि. १८) पासून कृषि तंत्रज्ञान सप्ताह आयोजित केला आहे. १८ ते २४ जानेवारी दरम्यान हा सप्ताह
पार पडणार आहे. त्याअंतर्गत माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे राष्ट्रीय अजैविक ताण व्यावस्थापन संस्थेमध्ये आयोजित दुष्काळ निवारण
यंत्रणा या चर्चासत्रामध्ये पवार बोलत होते.
ते पुढे म्हणाले, कृषिक्षेत्राबाबत विविध राष्ट्रीय संशोधन संस्था मोलाची कामगिरी पार पाडीत आहेत. मात्र या संस्थांना प्रादेशिक स्थितीबाबतची माहिती कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नसल्याचे पवार म्हणाले.

