Pune City News
पिपरी चिंचवड

बनावट एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हा

बनावट एफडीआर केल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड येथे पाच ठेकेदारांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पालिकेचे लेखा अधिकारी रमेशकुमार जोशी यांनी पिंपरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डीडी कन्स्ट्रक्शनचे दिनेश मोहनलाल नवानी, वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद जीवन मळगे, एस.बी. सवई कन्स्ट्रक्शनचे संजय बबन सवई, पाटील अ‌ॅण्ड असोसियटचे सुजित सूर्यकांत पाटील आणि कृती कन्स्ट्रक्शनचे विशाल हनुमंत कुऱ्हाडे अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

याबाबत पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेली माहिती अशी की, वेगवेगळ्या कामाच्या निविदामध्ये अनामत रक्कम ठेवायची असते. ती काही ठेकेदारांनी बनावट एफडीआर बँकेकडून काढून फसवणूक केली आहे.

याची महानगर पालिका आणि पोलीस आयुक्तालायकडून झालेल्या चौकशीनंतर महानगर पालिकेचे लेखा अधिकारी रमेशकुमार विठ्ठलराव जोशी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणात तब्बल १३ कोटी ८७ लाखांचा घोटाळा झाल्याचा संशय पिंपरी पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.

Related posts

भामा आसखेड धरणग्रस्तांनी जलवाहिनीचे काम पाडले बंद

Vishal Khandagale

देशातील पहिले मुलींचे निवासी वैद्यकिय महाविद्यलाय पुण्यात

Vishal Khandagale

पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना मिळणार डिजिटल पास !

Vishal Khandagale

Leave a Comment