Pune City News
पुणे

कात्रज परिसरात भीषण वणवा पेटला !

कात्रज भुयार मार्ग जवळील खाजगी क्षेत्रात काल संध्याकाळी साडेआठच्या सुमारास अचानक आग लागली . त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट पसरल्याचे  दिसून आले . हद्दीच्या वादामुळे आग नेमकी कोणी विझवायची यासंदर्भात प्रशासनाने टोलवाटोलवी केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत आगीचा वनवा धुसमुसत होता.

खासगी जागेतील झाडांना आग लागल्याने सुमारे दोन किलोमीटरवर आगीचे लोट दिसून आले. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास कात्रजमधील लागलेल्या आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशमक दलाला दिली होती. त्यानुसार अग्निशमक दलाने वनविभागाला आगीची माहिती दिली.

मात्र खाजगी जागेत आग लागल्याचे कारण देत वनविभागाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले नसल्याचा आरोप प्रत्यक्ष दर्शनी केला आहे. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण न मिळाल्याने वनवा भडकल्याचे दिसून आले.

Related posts

1 लाख 61 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे ..

Vishal Khandagale

उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट

Vishal Khandagale

महानगरपालिकेचे नवे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती

Vishal Khandagale

Leave a Comment