जंगली महाराज रोड लगत असलेल्या वाहनांना दुपारच्या सुमारास भीषण आग लागली.
या आगीने नंतर रौद्र रूप धारण केले. अखेर तीन फायर बंबच्या साहाय्याने ही आग विझवण्यात आली.
वाहतूक विभागाने शहरातील ओढून आणलेल्या गाड्या महापालिकेच्या जागेत काही वर्षांपासून ठेवलेल्या आहेत.
या वाहनांना दुपारी अचानक आग लागली. त्यामुळे या परिसरात काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या आगीत 10 ते 15 गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर अग्निशमन विभागाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

