वडगावशेरी राष्ट्रवादी काँग्रेस व शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिना निमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते . यामध्ये महिलांसाठी मोफत “स्तन कॅन्सर” तपासणी करण्यात आली . शिबिराचे आयोजन वडगाव शेरी राष्ट्रवादी महिला काँग्रेस विधानसभेच्या अध्यक्षा निताताई गलांडे व माजी शिक्षण मंडळ सदस्य राजेंद्र काटे यांनी केले होते. व मा. सुनील जाधव यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आले
तसेच वडगावशेरी विधानसभेच्या कार्याध्यक्ष पूजाताई काटकर व लीलाताई सोनवणे (उपाध्यक्ष सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान) यांनी नियोजना मध्ये मोठा सहभाग दर्शविला महिलांनी आरोग्या बद्दलची चिकित्सा जाणून शिबिराला छान प्रतिसाद दिला.

ह्यावेळी मंदाकिनी चांधारे (सरचिटणीस ) ,अलका ढगे ( येरवडा प्रभाग अध्यक्ष) यादेखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या तसेच बेबी रेवणे, किर्तीताई आखाडे भारती रिसर्च सेन्टर समतादूत,गायकवाड दादा, झेंडे दादा,जयदीप चांदणे व राष्ट्रवादी कॉंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते .प्रयास संस्थेचे डॉक्टर तृप्ती धारपवार, रुपाली गायकवाड, माया भिलारे, सिद्धी मुलक,यांनी महिलांना स्तन कॅन्सर संदर्भात महिलांना सर्व माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन केले.

