Pune City News
आरोग्यकोरोनापुणेपुणे शहर

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे शनिवारी पहाटे उपचारादरम्यान ससून रुग्णालयात निधन झाले.

गेल्या रविवारी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजेंद्र सरग यांच्याविषयी थोडक्यात –

सरग हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील होते. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद येथील एका वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली होती.

त्यानंतर राज्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची माहिती संचालनालयात नियुक्ती झाली.

पुणे येथे नियुक्ती होण्यापूर्वी सरग यांनी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले होते.

विशेष : कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राजेंद्र सरग यांचा नुकताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.

Related posts

पासोड्या विठोबाची दानपेटी फोडली

Vishal Khandagale

‘भारती’ हॉस्पिटलमध्ये ‘सीरम’च्या लसीची चाचणी

Vishal Khandagale

कोविड-१९ – नमुना तपासणीची क्षमता वाढवावी !

Vishal Khandagale

Leave a Comment