पुणे शहर :- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरक्षा जाळीवर उड्या मारत आंदोलन केलं आहे.
- स्वप्निल लोणकरला न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे.
- दरम्यान, पोलिसांनी जाळीवर उद्या मारणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे.

