खेळ

ICC कसोटी क्रमवारी; भारत अव्वल स्थानावर

ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

दुसरीकडे कसोटी मालिकेत पराभव स्विकारावा लागल्यानंतर गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची घसरण झाली असून ते आता तिसऱ्या स्थानी आहेत.

आत्तापर्यंत भारतीय संघाने 5 कसोटी मालिकेत 9 विजय आणि 3 पराभव तर एक सामना अनिर्णित राखला आहे. त्यामळे भारतीय संघाच्या नावावर 430 गुण असून विजयाची टक्केवारी 71.7 इतकी आहे.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघानेही 5 कसोटी मालिका खेळल्या असून त्यांना 7 सामन्यात विजय तर 4 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यांच्या विजयाची टक्केवारी 70 इतकी आहे.

तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 8 सामन्यात विजय तर 4 सामन्यात पराभव स्विकारावा लागाला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 69 इतकी आहे.

दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या तीन संघामध्ये पहिल्या दोन संघामध्ये स्थान मिळवण्याची टक्कर आहे.

Related posts

उर्वरित ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आता नाही : आयओसी

Vishal Khandagale

SRH vs RCB : हैदराबादसमोर 164 धावांचं आव्हान

Vishal Khandagale

आयपीएल क्रिकेट स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX