अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनाने निधन झाले असल्याचे वृत्त आले होते.मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा असून तो जीवंत असल्याचे स्पष्टीकरण ‘एम्स’कडून देण्यात आले आहे.
● छोटा राजनवर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार सुरु आहेत. त्याला दिल्लीत एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
● तिहार जेलमध्ये असताना एप्रिलच्या अखेरीस त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला काही दिवसांपूर्वी ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते.
● शुक्रवारी दुपारी त्याच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या, पण अखेर ‘एम्स’ने तो अद्याप जीवंत असल्याचे स्पष्ट केले आहे.

