PUNE CITY NEWS :- राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.आजपासून ” लॉकडाऊन 4″ ची सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या लाईव्ह मधील ठळक मुद्दे
▪️ कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन योग्यच.
▪️ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही अंशी शिथिलता आणली.
▪️ महाराष्ट्रात रेड झोनमधील निर्बंध शिथिल नाहीच.
▪️ कोरोनानंतर जग निश्चितच बदलेल.
▪️ रेड झोनचं ग्रीन झोनमध्ये रुपांतर करायचं आहे.
▪️ महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला मी तयार.
▪️ पाच लाख मजुरांना रेल्वे आणि बसने इतर राज्यांत पाठवले.
▪️ मजुरांनो घाई कशाला करताय? जेथे असाल तेथेच राहा.
▪️ मजुरांसाठी रेल्वे, बसची सुविधा करत आहोत.
▪️ धार्मिक सण-उत्सवांना अजून परवानगी नाही.
▪️ नव्या उद्योजकांनो, तुम्ही महाराष्ट्रात या, मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
▪️ घराबाहेर जाताना सावध राहा असं आता म्हणायला लागेल.
▪️ मजुरांनो सुरक्षेचाही तुम्ही विचार करा, थोडा धीर धरा.
▪️ 5 लाख मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवले.
▪️ लॉकडाऊन उठवला तर इटली सारखी परिस्तिथी होईल.
▪️ लॉकडाऊन हटवणार नाही, माझ्यावर टीका झाली तर होऊदे.
▪️ महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीका सहन करेन.
▪️ रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्सची सोयी सुविधा वाढवत आहे.
▪️ मी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार, या निश्चियाने बाहेर पडा
▪️ ग्रीन झोमध्ये एकही रुग्ण वाढू द्यायचा नाही.
▪️ महाराष्ट्रात 40 हजार एकर पेक्षा जास्त जमीन उद्योगांसाठी राखीव.
▪️ जगात पॉझचं बटण दाबलं आहे, आपल्याला भरारी घ्यायची आहे.
▪️ मजूरांकडून तिकीट घेतलेले नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च केला.
▪️ मुंबईत राहणारी पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील लोकांनाही घरी पाठवणार.
▪️ मजुरांची काळजी घेतली, 5-6 लाख मजुरांची जेवणाची सोय केली.

