Pune City News
राष्ट्रीय

“लॉकडाऊन 5.0” मध्ये जाणून घ्या काय बंद राहणार काय सुरू!

दिल्ली- लॉकडाऊन-0५ हा ३० जूनपर्यंत जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्यात एका राज्यातून दुस-या राज्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता नसेल. कोणालाही राज्याबाहेर ये-जा करता येणार आहे. रात्री ९ ते पहाटे ५ वाजे पर्यंत कर्फ्यु असेल. यापूर्वी संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत कर्फ्यु होता. ती वेळ कमी करण्यात आली आहे. कंटोन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत बंदी राहील. या झोन मध्ये मेडिकल इमरजेंसी सर्विसेस आणि आवश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे.

तसेच, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमास तूर्तास बंदी राहणार आहे. लग्नसोहळ्यासाठी फक्त ५० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी फक्त २० लोकांनाच एकत्र येण्याची मुभा देण्यात आली आहे

हे लॉकडाऊन तीन फेजमध्ये पाळण्यात येईल-

फेज १-
८ जूननंतर धार्मिक स्थळे, हाॅटेल, रेस्टाॅरंट, शाॅपिंग माॅल्स उघडे राहतील. मास्क बंधनकारक, सोशल डिस्टंन्सिंग पाळावी लागेल.

फेज २-
शाळा, काॅलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस संदर्भात जुलै महिन्यात निर्णय घेतला जाईल. राज्य सरकार विद्यार्थी आणि पालकांशी चर्चा करून शाळा काॅलेज सुरू करण्याबाबत निर्णय होणार.

फेज ३-
परिस्थितीत सुधारणा झाली तर आंतरराष्ट्रीय विमान, मेट्रो, चित्रपटगृह, जिम, स्वीमिंग पूल, ॲडोटोरियम, पार्क यावर निर्णय घेतला जाईल. तो पर्यंत बंदी असेल. सामाजिक-राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ स्पर्धा भरवणे यावर तिसऱ्या टप्प्यात निर्णय घेतला जाईल.

Related posts

या देशात लाँच झाली व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सेवा

Vishal Khandagale

व्हाइट हाऊसमध्ये कोरोनाचा रुग्ण!

Vishal Khandagale

कोरोना: 276 भारतीयांना कोरोनाची बाधा !

Vishal Khandagale

Leave a Comment