पुणे

औंध मधील तीन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू !

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली.

सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत.

स्थानिकांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह १४ पर्यटक फिरण्यासाठी दापोली तालुक्यात आले होते.

हे पर्यटक आज १८ डिसेंबर दुपारच्या वेळी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर गेले होते.

दरम्यान, पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहाही पर्यटक पाण्यात बुडाले.

Related posts

बिग बॉस फेम पराग कान्हेरेंचा “BIGG वडापाव

Vishal Khandagale

मला काय तेवढेच उद्योग नाहीत…: अजित पवार

Vishal Khandagale

आज 193 वा “गनर्स डे”

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX