Uncategorized

नवले रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी डिसेंबर महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे कामबंद आंदोलन !

PUNE CITY NEWS :- डिसेंबर 2019 पासून पगार न मिळाल्यामुळे पुण्यातील सिंहगड परिसरात असलेल्या नवले रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी आज  सकाळापासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

विशेष म्हणजे, या रुग्णालयात 80 कोरोनाबाधितांवर उपचार होत आहेत. तर 60 जण आयसोलेशन वॉर्डात आहेत. कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन पुकारल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.लॉकडाऊन काळात कामावर न आलेल्या सुमारे 200 जणांना कामावरून काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यापासून पगार देण्यात आलेले नाही. नेहमी केवळ आश्वासने दिली जातात. त्यामुळे कामबंद आंदोलन सुरु केल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.रुग्णालयाच्या समोर मोठ्याप्रमाणात हे कर्मचारी जमा झाले आहेत. यामुळे रुग्णांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसत आहे.

Related posts

शिक्रापूर येथे ४१लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

Vishal Khandagale

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 29 वर

Vishal Khandagale

शिवाजीराव भोसले बँकेच्या मुख्य कार्यालयावर ईडीची धाड

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX