Pune City News
राष्ट्रीय

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; ‘या’ शास्त्रज्ञांचा होणार गौरव

जगातला सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा भौतिक शास्रातील नोबेल पुरस्कार यंदा 3 शास्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे.

  •  भौतिकशास्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं. रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज या 3 शास्रज्ञांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे.
  •  ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केलं.
  •  ब्लॅकहोल शोधला : तर रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोन्ही शास्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या अतिविशाल ब्लॅकहोल शोधून काढला.
  •  गौरव : त्यांचं हे काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचं आहे. त्यामुळंच त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
  •  पुरस्कारांची घोषणा : या तिघांनाही 11 लाख डॉलरच्या रकमेसह सुवर्णपदक दिलं जाणार आहे. स्वीडनच्या स्टॉकहोममधून आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

Related posts

चिनी कंपनीला दिलेले 500 कोटींचे कंत्राट रेल्वे रद्द करणार

Vishal Khandagale

सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांची आत्महत्या

Vishal Khandagale

‘फोर्ब्स’ची 100’ श्रीमंतांची यादी जाहीर; कोरोना लस तयार करणारे ‘हे’ टॉप टेनमध्ये

Vishal Khandagale

Leave a Comment