Pune City News
पुणे

मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेश : मानवतावादी समाजसेवा संघटने मार्फत

पुण्यातील मानवतावादी समाजसेवा संघटनेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये ७५.००० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

मानवतावादी समाजसेवा संघटनेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये या संघटनेच्या सदस्यांमार्फत अनाथाश्रम, वृध्दाश्रम, अंध व्यक्तींच्या संस्था यांना आर्थिक मदत करण्यात येते. या संघटनेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.

सध्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या संघटनेमार्फत आज रुपये ७५,००० रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री सहायता निधीस’ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नायब तहसिलदार श्रावण ताते यांच्याकडे जमा करण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष गफ्फार खान,सचिव अशोक जाधव, उपाध्यक्ष प्रकाश रावळकर, अरविंद पिल्ले, श्रीनिवास नंबियार तसेच सदस्य एम.के. भंडारी इ.उपस्थित होते.

Related posts

स्वच्छ सर्वेक्षणात देहूरोड कॅंटोन्मेंट राज्यात अव्वल

Vishal Khandagale

जम्बो कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव

Vishal Khandagale

कोविड केयर सॉफ्टवेअरचे प्रकाशन

Vishal Khandagale

Leave a Comment