“होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी,” म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते दानवे :
▪️ महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार आहे.
▪️ राज्यात या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील.
देशमुख म्हणाले :
▪️ दानवे म्हणाले ते बरोबरच, महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो. कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो.
▪️ कारण होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी…
दरम्यान, मंत्री दानवेंनी पुण्यातील पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका केली होती, त्यावर गृहमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

