Pune City News
पुणे शहरहडपसर

आमदार चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद सोडणार !

पुणे शहर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे  यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहिले असून पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आमदार चेतन तुपे हे मागील अडीच वर्षांपासून राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. मतदारसंघात काम करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांनी आता शहराध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘आपल्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्षाचा जनाधार व्यापक करण्यासाठी काम केले. त्यातून बरंच काही शिकता आलं. अनेक समस्यांची जाण व भान आले. पुढील काळात याचा मला निश्चितच उपयोग होईल.

हडपसर विधानसभा मतदारसंघात ५ लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. त्यात समाजातील विविध घटकांचा समावेश आहे. या सगळ्यांशी संपर्क ठेवण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. स्वहितापेक्षा पक्षहिताला प्राधान्य देणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं मला शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती तुपे यांनी पत्राद्वारे केली आहे

Related posts

पुणे शहर भाजपचे ५२५० रक्त पिशव्यांचे संकलन

७ वर्षात मोदी सरकारने देश केला भकास!- रमेश बागवे

Vishal Khandagale

आज शहरात 4103 पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

Leave a Comment