Pune:-पुण्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांचा शोध घेण्यात येत असतानाच एका कंपनीतील कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लक्षणे आढळल्याने आयटी कंपनीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात काेराेना विषाणू झपाट्याने वाढत आहे याचा धसका आयटी कंपन्यांनी घेतल्याचे समजते
मगरपट्टासिटीतील एका आयटी कंपनीमधील कर्मचाऱ्याला काेराेनाची लक्षणे आढळल्याने त्याची चाचणी करण्यात आली.
यावेळी खबरदारी म्हणून कंपनीचा सर्व फ्लाेअर रिकामा करण्यात आला असून कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचा पर्याय दिला आहे. अशी माहिती कंपनीने अधिकृतपणे दिली नसून कर्मचायांना मेलवर दिली आहे.
दरम्यान, असाच प्रकार हिंजवडीतील आयटी कंपनीतदेखील घडला असून तेथील एक कंपनीचे ऑफिस रिकामे करण्यात आले आहे.
previous post
next post

