आमदार मुक्ताताई टिळक यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून पुणे महानगरपालिका व पुणे पोलीस यांच्याकरिता #covid-19 आजाराच्या उपाययोजनेकरिता रुपये ५०.०० लक्षचे वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. सदर साहित्याचे वाटप आज मा.खासदार गिरीष बापट यांच्या हस्ते लोकमान्य सभागृह नारायण पेठ पुणे येथे करण्यात आले.

यावेळी आमदार मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने पुणे महानगरपालिका , सभागृहनेते धीरज घाटे, उपमहापौर सरस्वती ताई शेंडगे, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ अंजली साबणे, कसबा विश्रामबागवाडा क्षत्रिय अधिकारी आशिष महाडदळकर, भवानी पेठ क्षत्रिय अधिकारी बनकर सर, पोलिस प्रशासन अधिकारी, मतदार संघातील सर्व नगरसेवक ,कसबा भाजप अध्यक्ष प्रमोद कोंढरे, महिला आघाडी अध्यक्षा वैशाली नाईक आदी उपस्थित होते. पुणे शहरातील सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पुणे महानगरपालिका प्रशासकीय अधिकारी, पुणे पोलिसांचे कोरोना संसर्गजन्य आजाराने उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करत असल्याबद्दल धन्यवाद दिले. त्यांच्या परिश्रमामुळे कोरोना पुण्यामध्ये आटोक्यात येत आहे, सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन खासदार गिरीष बापट यांनी यावेळी केले.
previous post

