Pune City News
राष्ट्रीय

दोन दहशतवाद्यांचा खात्मा !

PCN

PUNE CITY NEWS :-  जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षादलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. वानपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षादलाच्या हाती लागली होती. त्यानंतर सुरू केलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान सुरक्षा दलाने ही कारवाई केली.

हत्यारे: भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या एका संयुक्त टीमने ही कामगिरी केली आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांजवळ काही हत्यारेही सापडली आहेत.

सुरक्षादल तत्पर : काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात दहशतवादाने पुन्हा एकदा तोंड वर केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुरक्षादलाकडून आपली कारवाई तत्पर केली आहे.

विशेष म्हणजे, कुलगाममध्ये पाच दिवसांत हे दुसरे ऑपरेशन आहे. यापूर्वी मंजगाम भागात सुरक्षा दलाने एन्काऊंटरमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील वानपुरा भागात दहशतवादी असल्याची गुप्त सूचना मिळाल्यानंतर या परिसराला वेढा घालून सर्च ऑपरेशन सुरू केले.

दरम्यान सुरक्षादलावर दहशतवाद्यांकडून गोळीबार केला, त्यानंतर प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत दोन जणांना ठार केले असून सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे.

Related posts

3 विमानतळांच्या खाजगीकरणाला केंद्राची मंजूरी

Vishal Khandagale

क्रूरतेचा कळस! सामूहिक बलात्कारातील तरुणीचा मृत्यू

Vishal Khandagale

कोरोना; राज्यातील सर्व निवडणुकांना स्थगिती

Vishal Khandagale

Leave a Comment