Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

जि.प.शाळा देणार ऑनलाइन शिक्षण

राज्यातील जिल्हा परिषद शाळा ऑनलाइन शिक्षण देण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी राज्य सरकारकडून एक अँप विकसित करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

खासगी शाळांचा विचार करता जिल्हा परिषद शाळांनीही एक पाऊल पुढे टाकण्याचे ठरवले आहे.त्यामुळे खासगी शाळांना पर्याय म्हणून हे पाऊल उचलले जात आहे.
हे ऍप वापरण्यासाठी आवश्‍यक असलेल्या ऍन्ड्रॉइड मोबाईलची ग्रामीण भागातील पालकांकडे मोठी वानवा पहायला मिळत याआहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देण्यात मोठा अडसर देखील निर्माण होणार आहे. या गोष्टीचाही विचार होणे गरजेचे आहे.

याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वृत्ताला पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती रणजित शिवतरे यांनीही दुजोरा दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना प्रादुर्भाव व लसीकरण तयारीचा आढावा

Vishal Khandagale

पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील कामाचे सोशिअल ऑडिट होणे आवश्यक; आबा बागुल

Vishal Khandagale

पुणे विभागात अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा

Vishal Khandagale

Leave a Comment