Pune City News
पिपरी चिंचवड

जबरदस्तीने कापला फीचा पहिला हप्ता !

PUNE CITY NEWS :- आकुर्डी गंगानगर येथील न्यू पुणे पब्लिक स्कूलकडे पालकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फी चा पहिला हफ्ता घेवू नका अशी विंनती करुनही शाळेने हफ्ता वसुल केल्यामुळे पालकांनी शाळेसमोर संताप व्यक्त केला.

राज्य सरकारच्या आदेशानुसार जोपर्यंत शाळा सुरु होत नाही.
तोपर्यंत फी घेण्यात येवून नये असे आदेश असताना. शाळेने फी घेवू नये या मागणीचे निवेदन पालकांनी शाळा प्रशासनाला दिले होते.

तरी देखील शाळेने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पहिला हफ्ता भरण्यासाठी एसएमएस पाठविला. तसेच पालकांनी हफ्ता जमा न केल्यास दंड आकाराला जाईल असेही सांगण्यात आले.

कोरोनामुळे ८० टक्के पालकांचे तीन महिन्यापासून पगार नाहीत. तरी देखील शाळेकडून फी वसुल करण्यात आली. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. कोरोनामुळे सर्व पालकांचे रोजगार व व्यवसाय डबघाईला आले आहेत.

अशा परिस्थितीत शाळेने पालकांकडून वसुल करण्यात आलेला पहिला हफ्ता त्वरित जमा करावा अशी मागणी पालकांनी यावेळी केली.

याबाबत संस्थाचालक प्रदीप खंदारे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.

Related posts

पुणे शहरातील सर्व उद्यान बंद

Vishal Khandagale

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागा बिनविरोध,अधिकृत घोषणा बाकी

Vishal Khandagale

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला..भारतासाठी पुढील 30 दिवस महत्त्वाचे !

Vishal Khandagale

Leave a Comment