Pune City News
पुणे

पत्रकार संघातर्फे सभासद आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध

पुणे आणि परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. दोनच  दिवसांपूर्वीच आरोग्यसेवा वेळेत न मिळाल्यानेआपल्या  एका  सहकाऱ्याला जीव गमवावा लागला आहे . या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघ, MVR welfare foundation आणि शिवसंग्राम संघटना यांच्या माध्यमातून पत्रकार संघाचे सभासद आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका पत्रकार संघाच्या आवारात २४ तास उपलब्ध असेल. त्यामुळे आपणापैकी कोणाही  सहकाऱ्याला किंवा त्यांच्या कुटुबियांसाठी अगदी कधीही गरज पडल्यास तात्काळ उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

ही रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध असेल. ज्यांना ऐच्छिक देणगी स्वरूपाचे मूल्य द्यायचे असेल ते तसे देऊ शकतात. ती रक्कम थॅलेसेमिया रोगावर काम करणाऱ्या MVR welfare foundation या संस्थेला देण्यात येईल..

यासाठी संपर्क  :-

प्रसाद कुलकर्णी ( अध्यक्ष ) ९८८१०९८३६९ ,चंद्रकांत हंचाटे  ( सरचिटणीस )  ९५५२२५४७७७

Related posts

पुण्यात “बारामती पॅटर्न” वापरा : अजित पवार

Vishal Khandagale

“कोरोना” बाबत अफवा पसरवणारी शिक्षिका निलंबित!!

Vishal Khandagale

शिवाजी मतदार संघाच्या चिटणीस पदी

Vishal Khandagale

Leave a Comment