Pune City News
पुणे

सरकारने जाहीर कार्यक्रमांना त्वरित परवानगी द्यावी

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन संपल्यानंतर ‘अनलॉक’मध्ये इतर व्यवसायांना टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, जाहीर कार्यक्रम, लग्न समारंभ, इव्हेंट्स, सांस्कृतिक सभागृहे, थिएटरमधील कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही.

त्यामुळे यासंबंधित क्षेत्रात काम करणारे साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, ट्रस, कलाकार, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफेर्स, बँड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर डी. जे. असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. लाखो रुपयांची इक्विपमेंट्स धूळ खात पडून आहेत.

सरकारने याचे गांभीर्य ओळखून जाहीर कार्यक्रम आयोजिण्यास त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली.

याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी, सोमनाथ धेंडे, शिरीष पाठक, सूर्यकांत बंदावणे, शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Related posts

पुणे शहरात दिवसभरात १६८ रुग्ण कोरोनामुक्त !

Vishal Khandagale

मधुराणी गोखले आणि विवेक सांगळे यांनी ‘बिग बेस्ट कॅरेक्टर’ ची ट्रॉफी जिंकली

Vishal Khandagale

पुणे शहरातील सर्व पेठा,पुणे RTO ते गुलटेकडी, कोंढवा भाग सील

Vishal Khandagale

Leave a Comment