Pune City News
पुणे

बाणेर मधील नागरिकांनी विजेच्या खांबांवर पेटवल्या मशाली

बाणेर येथील रहिवाश्यांनी स्मार्ट सिटी चा  बोलबाला फोल ठरवला आहे . वारंवार तक्रार करुनही पदपथावरील दिवे सुरु केले जात नसल्याने त्यांनी चक्क या दिव्यांना मशाल लावुन या कारभाराचा निषेध केला आहे.

बाणेर-सुस-म्हाळुंगे शिव (बेलाकसा सोसायटी ते पाडळे वस्ती) मेन रोडवरील दिवे गेली अनेक वर्षे बंद आहेत. पण तक्रारी करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने अडथळ्यांना सामोरे जावे लागणारे नागरिक वैतागले होते. सोयी बरोबरच सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत असल्याने अनेकदा नागरिकांनी अनेकदा अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती.

पण प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांनी स्मार्ट कारभाराला पुणेरी बाणा दाखवला आहे. बाणेर बालेवाडी येथील येथील स्ट्रीट लाईट्स लवकरात लवकर कनेक्शन देऊन अथवा बंद पडलेल्या लाईट्स बदलुन येथील स्ट्रीट लाईट्सचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या मागणीसाठी “मशाल आंदोलन” करण्यात आले.

बाणेर सारखा भाग हा स्मार्ट सिटीमधल्या एरीया डेव्हलपमेंटचा भाग आहे. अशा भागात पदपथावरील दिव्यांचा अभाव आणि परिणामी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणे. आणि रस्त्यांवर मशाल घेऊन नागरिकांसाठी प्रकाशाचा पर्याय निर्माण करणे हे स्थानिक नगरसेवकांच्या निष्क्रियतेचे फळ आहे असे लहू बालवडकर यांनी सांगितले.

Related posts

बारामती पोलिसांची धडक कारवाई, ४७ लाखांचा गांजा जप्त

Vishal Khandagale

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सहकार्या ने चिमुकली पोहचली घरी !

Vishal Khandagale

कोरोना : 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त!

Vishal Khandagale

Leave a Comment