Pune City News
मनोरंजनमहाराष्ट्र

न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन; कोरोनाचीही झाली होती लागण

दिल्ली :-  प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनाचा संसर्ग झाल्याने आज सकाळी निधन झाले. ते गेल्या काही कालावधीपासून झी न्यूज या वृत्तवाहिनीमध्ये न्यूज अँकर म्हणून कार्यरत होते. सरदाना यांचे निधन झाल्याची माहिती झी न्यूजचे मुख्य संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर चौधरी यांनी ट्विट करून दिली.

रोहित सरदाना हे आज तक वृत्तवाहिनीवर प्रसारित होणाऱ्या दंगल या शोचे अँकरिग करत होते. त्यांना 2018 मध्ये गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला त्यामध्ये त्यांचे निधन झाले. याबाबतची माहिती देताना सुधीर चौधरी यांनी ट्विटमध्ये म्हटले, की ‘काही वेळापूर्वी जितेंद्र शर्मा यांचा फोन आला. त्यांनी जी बातमी दिली त्यानंतर माझे हात थरथरत होते. माझे मित्र आणि सहकारी रोहित सरदाना यांच्या मृत्यूची बातमी आली. हा व्हायरस आमच्यातील इतक्या जवळच्या व्यक्तीला घेऊन जाईल, ही कल्पनाही केली नव्हती. यासाठी मी तयार नव्हतो. हा देवाकडून अन्याय आहे…ॐ शान्ति…’

Related posts

कोरोना:-23 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द !

Vishal Khandagale

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ संजीवन समाधी सोहळा…

Vishal Khandagale

भारताला मिळाले मोठे यश

Vishal Khandagale

Leave a Comment