Pune City News
गुन्हे विषयकपुणे शहरवडगावशेरी

बँक अधिकाऱ्यांनीच काढले मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे

पुणे शहर :-  आजारी व ज्येष्ठ नागरिकांना घरपोच बँकिंग सेवा देताना हा प्रकार उघडकीस आला आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक केली आहे.

अंकिता रंजन (वय 30) आणि जुबेर गांधी (वय 34) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रशेखर राजगोपालन यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या वडिलांचे विमानतळ येथील इंडसंड बँकेत बचत खाते आहे. त्यांचे वडील आजारी असल्याने त्यांच्या खात्याचा व्यवहार बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर अंकिता रंजन आणि व्यवस्थापक जुबेर गांधी हे घरी येऊन आवश्यक ती मदत करत होते. दरम्यान 10 मार्च रोजी फिर्यादी यांच्या वडिलांचे निधन झाले.

त्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांच्या मोबाईलवर निप्पॉन इंडिया म्यूचुअल फंड या कंपनीचा मेसेज आला. 22 मार्च रोजी केलेल्या विनंती मध्ये बनावट सही असल्यामुळे व्यवहार पूर्ण करता येत नाही असेे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर फिर्यादीला या सर्व प्रकाराचा संशय आला. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन माहिती घेतली असता त्यांच्या वडिलांच्या खात्यात केवळ 4 हजार 596 रुपये दिसून आले. त्यानंतर त्यांनी मांजर पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी तपास केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. फिर्यादी दोन लाख 37 हजार रुपये कोणीतरी काढून घेतल्याचे दिसून आले यांच्या वडिलांच्या खात्यावर असलेले फिक्स डिपॉझिट बंद करण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या बनावट सह्या करून 24 मार्च रोजी त्यांच्या खात्यातून दोन लाख 37 हजार रुपये कोणीतरी काढून घेतले होते. हा सर्व प्रकार बँकेतील अधिकारीच केल्याचे निष्पन्न झाल्यावर मात्र पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

Related posts

आंबेगाव येथे तरुणाचा मृतदेह आढळला पोत्यात

Vishal Khandagale

एक कोटींचा गांजा, ७५ लाखांचे चरस जप्त

Vishal Khandagale

येरवडा जेलमधील महिलांच्या खुल्या कारागृह ; शेतातील 3 चंदनाच्या झाडांची चोरी

Leave a Comment