Pune City News
खेळराष्ट्रीय

विश्वनाथन आनंद ‘येथे’ अडकले!

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. संपुर्ण जगात कोरोनामुळे भीतीच्या सावटाखाली आहे.
बुध्दिबळ खेळाचा राजा विश्वनाथन आनंद कोरोनामुळे जर्मनीत अडकले आहेत. बुद्धिबळ स्पर्धेसाठी ते जर्मनीत गेले होते, मात्र कोरोनामुळे त्यांचा तेथील मुक्काम वाढला आहे. आज ते भारतात येणार होते मात्र मार्चअखेरपर्यंत त्यांना भारतात येता येणार नाही.
50 वर्षीय आनंद फेब्रुवारीत जर्मनीला गेले होते, ते आता जर्मनीत सर्वांपासून बाजूला राहत आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबियांशी मित्रांशी संवाद साधला आहे.
विश्वनाथन आनंद म्हणाले : माझ्यासाठी हा एक विलक्षण अनुभव आहे. आयुष्यात प्रथमच माझ्या आणि कदाचित अनेकांना स्वतःला सर्वांपासून दूर ठेवण्याची वेळ आली आहे.
दिवसातून एक फोन घरच्यांना करतो. व्हिडीओ कॉल करून मुलगा अखिल आणि पत्नी अरुणा यांच्याशी संवाद साधतो, असेही त्यांनी सांगितले.

Related posts

जागतिक ग्राहक दिन

Vishal Khandagale

घरपोच सेवेसाठी ई-कॉमर्स कंपन्या पुन्हा मैदानात

Vishal Khandagale

कोरोना : देशभरात टोलवसुली तात्पुरती स्थगित!

Vishal Khandagale

Leave a Comment