Pune City News
पुणे

घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . – आमदार सुनिल कांबळे

घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या फैलवाली चाळ व पंचशील नगर येथील रेल्वेलगतच्या सर्व झोपडपट्ट्या तोडू दिल्या जाणार नाही . असे स्थानिक आमदार सुनिल कांबळे यांची रहिवाश्याना आश्वासन दिले . यावेळी दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम , दलित पँथर पुणे शहर अध्यक्ष जॅक्सन अँथोनी , बापू माने , विपीन नायर , मुद्दसर शेख , जॅक्सन पानेम , रघु वाघमारे , गणेश जगताप ,लासी कांबळे व वसंत गायकवाड , रमेश पोळ , आकाश आवळे व शेकडो झोपडपट्टी वासीय उपस्थित होते

यावेळी आगवली चाळ हटवण्याच्या विषयावर ठोस निर्णय घेण्यात आले आहे, व रेल्वेलगतच्या सर्व झोपडपट्ट्या तोडल्या जाणार नाही याची खात्री आमदार सुनिल कांबळे यांनी रहिवाश्याना दिली . यासाठी लवकरात लवकर डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांची भेट घेणार आहोत .

आज कोविड १९ च्या महामारितुन संपुर्ण जग,भारत गंभीर संकटाचा सामना करत पुढे चाललेले आहे. तरी देखील येथील झोपडपट्टी वासियांचे अतिक्रमण असे घोषित करुन घरे सोडण्याबाबत नोटीसा दिलेल्या आहेत. अशी माहिती दलित पँथर पुणे शहर अध्यक्ष जॅक्सन अँथोनी यानी दिली

Related posts

पुणे शहर पोलीस दल कल्याण’ साठी ५० लाख रूपयांचा धनादेश हस्तांतरीत

Vishal Khandagale

झोपडपट्टी मधील नागरिकांना कोरोना ची लस मोफत द्या – पुणे शहर युवक कॉंग्रेस

Vishal Khandagale

पुणे छावणी मधील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी..

Vishal Khandagale

Leave a Comment