Pune City News
गुन्हे विषयकपुणेहडपसर

कोंढव्यात अवैध दारू विक्रेत्याच्या घरात १ कोटी ८५ लाखांची रोकड जप्त !


पोलिसांची छापेमारी; ‘दारू मोजायची की नोटा?’ असा प्रश्न
पुणे |कोंढवा परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल १ कोटी ८५ लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. दारूच्या फुग्यांची मोजणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना प्रत्यक्षात नोटांच्या गठ्ठ्यांची मोजदाद करावी लागली, अशी उपरोधिक चर्चा परिसरात रंगली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या विक्रेत्याने बेकायदेशीर मद्यविक्रीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक साठा केला होता. घरात विविध ठिकाणी रोख रक्कम लपवून ठेवण्यात आली होती. छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणावर मद्यसाठाही जप्त करण्यात आला आहे.


या कारवाईनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, “एवढ्या पैशात तर नगरसेवकाची निवडणूक सहज लढवता आली असती” अशी मिश्किल पण टोचणारी प्रतिक्रिया उमटत आहे. सर्वे, मुलाखती, निष्ठा, जनसंपर्क यांसारखी राजकीय औपचारिकता बाजूला ठेवूनही कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली असती, अशी उपरोधिक टिप्पणीही ऐकायला मिळत आहे.


दरम्यान, पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात अवैध मद्यविक्री, बेकायदेशीर संपत्ती साठवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार या कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, रोकड जप्त करून तिचा स्रोत तपासण्यास सुरुवात केली आहे. या रकमेचा वापर निवडणुकीसाठी किंवा इतर बेकायदेशीर कारवायांसाठी होणार होता का, याचाही तपास सुरू आहे.


कोंढव्यातील या घटनेमुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळा पैसा, गुन्हेगारी आणि राजकारण यांचे नाते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. प्रशासनाने अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related posts

पुणे विद्यापीठाची ‘सेट’ परीक्षा लांबणीवर

Vishal Khandagale

राज्य सरकाचा नवा आदेश, 1 एप्रिलपासून सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेत

Vishal Khandagale

कोरोना विषाणू बाबत आयुक्तांनी घेतला आढावा !

Vishal Khandagale

Leave a Comment